Tuesday, May 12, 2015

महानुभाव पंथ

महानुभाव पंथ मुकुंदराजांनंतर आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात. महानुभाव पंथाचे मूळ पुरुष गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ हे होते परंतु या पंथाचे प्रणेते मात्र चक्रधर आहेत. चक्रधरांचा कालखंड (इ. स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. देवगिरीच्या यादवांची कारकीर्द या वेळी महाराष्ट्रात होती. समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात चक्रधरांनी शंकराचार्य (अद्वैत) व रामानुजाचार्य (विशिष्टाद्वैत) यांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ करून (ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून) आपल्या द्वैती तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सामान्य देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्यावर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय अशा सर्वांनाच संन्यास घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन, लिंगायत, नाथ इत्यादी संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. चक्रधर (आणि पुढे) ज्ञानदेव यांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. ओळख[संपादन] महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथावर भाष्य-महाभाष्य लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरुप श्री चक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचे वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला ते हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात. महानुभाव पंथ व साहित्य[संपादन] यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. ‘महानुभाव’ या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. चक्रधरोक्त सिद्धान्तसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी दत्तात्रय, श्रीकृष्ण चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे. अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभवांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे ‘कारण प्रपंच’ व ‘कार्य प्रपंच’ असे दोन भाग केले आहेत. ‘कारण प्रपंच’ हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे. कार्यरूप प्रपंच हा व्यक्त आणि अनित्य होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘प्रपंचु संहारे’ असे म्हटले असल्यामुळे प्रपंच अनित्य वर्गातला आहे, यात शंका राहत नाही. अविद्या अनादि मानली तरी ती नित्य असली पाहिजे, असे अनुमान करण्याचे कारण नाही. कारण–अविद्या व कार्य−अविद्या मोक्षस्थितीत संपूर्ण नाश पावतात, असे गौतम बुद्ध व शंकराचार्य यांचे मत आहे, तेच चक्रधर स्वामींनी मान्य केले आहे (महाराष्ट्र जीवन, खंड १, पृष्ठ २१९). देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे, असे ते समजतात. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे, अशी त्यांची धारणा असते. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे. संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहान्तापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते. महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यासदीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. नागदेवाचार्य हे चक्रधरांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरुढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिववास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभू व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली. डॉ. कोलते ह्यांच्या मते ते कर्तृत्व शंकास्पद आहे. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे व मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यानी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ व इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिववासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ व बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराथी भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी माठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :) (स्मृ. स्थ. १५, ६६). चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीस लक्ष्मणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर गोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल. भासकरभट हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. काही आग्नायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ निबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, धर्ममते भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यास येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक लिप्या तयार झाल्या असल्या, तरी बहुतेक ग्रंथ सकळ लिपीतच आढळतात. परशुराम आचार्यांच्या काळात निर्माण झालेल्या अनुयायांची नावे अशी : (१) कवीश्वर, (२) उपाध्ये, (३) पारिमांडल्य, (४) अमृते, (५) मदळसा, (६) कुमर, (७) यक्षदेव, (८) दामोदर, (९) हरिदेव, (१०) जयदेव, (११) साळकर, (१२) दिवाकर आणि (१३) महेश्वर. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशूद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपसना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभवांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत करणारा म्हणून महानुभावी वैष्णव पंथ[संपादन] महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायामध्ये महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. अवतार[संपादन] श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चक्रपाणी, गोविंदप्रभू, चक्रधरस्वामी महानुभावीय तत्त्वज्ञान[संपादन] ‘सूत्रपाठ’ या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते, या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास ‘द्वैती पंथ’ म्हणतात. ‘देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे’ असे या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. जीव : जीव बद्धमुक्त म्हणजे बद्ध असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे. तो मूलतः स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे पण अविद्येमुळे त्याला काळसरपणा प्राप्त झालेला आहे. तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात, तसा जीव हा ‘पाच पिशीं’नी युक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमळ या त्या पाच पिशी होत. यासाठी उद्धवगीतेत मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टांत दिला आहे. यांतील सर्वांत तळाचे मडके अविद्या हे आहे. हे अविद्येनेच मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील. (तळीचील हाणितलेया वरिचील पडे : उतरंडी गडबडी) प्रपंच : प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. कारणप्रपंच व कार्यप्रपंच असे त्यांनी प्रपंचाचे दोन भाग केले आहेत. अव्यक्त असणारी पंचमहाभूते व त्रिगुणी म्हणजेच कारणप्रपंच होय. कार्यप्रपंचाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम हे त्रिगुण यांच्यातून झाली आहे. देवता : देवतांना महानुभावांनी गौण मानले आहे. परमेश्वर हा नित्यबद्ध असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. (परमेश्वर एकु सोडविता) परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे, अथवा भक्ती केली म्हणजे, जीवाला मोक्ष मिळतो. मोक्ष परमेश्वराकडूनच मिळू शकतो. देवतांकडून नाही. देवतांचे कार्य सृष्टीतील जिवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे होय. वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने आहेत. महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान[संपादन] व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत, असे काही विद्वान मानतात. त्यांच्या मते दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक[संपादन] बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते. पहा: महानुभाव साहित्य संमेलन संदर्भ[संपादन] • http://bhagvans.blogspot.in/ (महानुभाव पंथाचे संकेतस्थळ) ________________________________________ प्रमुख महानुभावी व्यक्ती[संपादन] • केशिराज बास • नागदेवाचार्य • गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ • नागराजबाबा • भानुकवी जामोदेकर : हे मूळचे गोदमगाव (तालुका - बिलोली, जिल्हा - नांदेड) येथील आहेत . त्यांचा जन्म ८ जुलै १९२४ रोजी झाला. त्यांचे पाळण्यातले भास्कर असे ठेवले होते. त्यांची आई आजारपणाने लवकर वारली. पित्याला वाटले मी याचा सांभाळ करू शकत नाही त्यामुळे त्यांनी त्या बालकास पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचे ठरविले. पण आयत्या वेळी दत्तराज बाबा जामोदेकर हे त्यावेळी भिक्षेच्या निमित्ताने तेथे आले आणि त्यांनी या बालकाला सांभाळण्याचे वचन दिले. त्यांनी या बालकास वाजीरगाव येथे आपल्या मठात आणले, व त्याचे संगोपन्केले. पुढे भासकराबे महानुभाव पंथाचा अभ्यास केला आणि संन्यासाश्रम स्वीकारला. भास्कर याला त्यांना लहानपणापासून कविता आणि भजनाचा छंद होता. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी अनेक भजने रचली, आणि ते भानुकवी जामोदेकर म्हणून प्रसिद्धी पावले. पुढे त्यांनी परभणी जिल्ह्यातील बोरी येथे काल्लुचरकर बाबांच्या सहवासात काही दिवस काढले. त्यांची काव्यप्रतिभा पाहून जुनी मंडळी फारच खुश झाली. • बाभूल्गावकरबाबा शास्त्री महानुभाव पंथाचे अभ्यासक[संपादन] महानुभाव पंथ हा सर्वांत जुन्या पंथांपैकी एक असला तरी राजकीय आक्रमणांमध्ये पंथीय साहित्य पुन्हापुन्हा नष्ट होण्याचे प्रसंग आले. त्यामुळे सांगीवांगी लीळा मिळवून पुनर्लेखनाचे प्रयत्न झाले. कोणत्या लीळा मूळ आहेत याविषयी (त्यांचा मोठा जाणता वर्ग संन्यस्त असल्यामुळे) पंथेतर साहित्यिकांनी केलेले संशोधन खऱ्या पंथश्रद्धांशी जुळत नाही असा आक्षेप पंथीयांनी कालौघात घेतला. विष्णू भिकाजी कोलते यांचा अग्रगण्य महानुभाव साहित्य संशोधक म्हणून परिचय होता. पण नंतरच्या काळात पंथ संप्रदायाच्या लोकांनी काही मुद्द्यांवरील त्यांचे लेखन अमान्य असल्याचे सांगितले. चरणांकित तीर्थस्थाने[संपादन] • पिंगळभैरव देवस्थान, अचलपूर • वटेश्वर निद्रास्थान वडनेर-भुजंग • सर्पद्वयपतन स्थान वडनेर-भुजंग • वाळकेश्वर मंदिर, पातूर • उत्तरेश्वर मंदिर, आलेगाव • वाळकेश्वर मंदिर, आलेगाव • काटेशुक्रमबाबा संस्थान, काकडा • अष्टमासिद्धी देवस्थान • बारा घोडा स्थान - रिद्धपुर • भैरव बुरुज स्थान - रिद्धपूर • भिंगार जिल्हा अहमदनगर • विघ्नेश्वरी बाबा, येळवण, जिल्हा अकोला • श्रीक्षेत्र जाळीचा, बुलढाणा जिल्हा प्रमुख ग्रंथ[संपादन] आठवणी, दिनचर्या, स्थळवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक भावगीतसदृश, तात्त्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना महानुभावांनी केली आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, ऋद्धिपूरचरित्र, सिद्धान्तसूत्रपाठ, दृष्टांतपाठ व पूजावसर हे गद्यवाङ्‌मय एका धार्मिक प्रेरणेतून आल्याचे दिसते. या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत. गद्यग्रंथ[संपादन] • लीळाचरित्र (म्हाइंभट, १२७८) • श्रीगोविंदप्रभूचरित्र / ऋद्धिपूरलीळा / ऋद्धिपूरचरित्र (म्हाइंभट, १२८८) • दृष्टांतपाठ (केशिराजबास, १२८०) • सिद्धांतसूत्रपाठ (केशिराजबास, १२९०) • पूजावसर (बाइदेवबास, १२९८) • स्मृतिस्थळ (संकलन, १३१२) • वृद्धाचार • वृद्धान्वय • मार्गरूढी पद्यग्रंथ[संपादन] • रुक्मिणीस्वयंवर (नरेंद्र, १२९३) • शिशुपाळवध (भास्करभट्ट बोरीकर, १३१२) • उद्धवगीता (भास्करभट्ट बोरीकर, १३१३) • वछाहरण (दामोदरपंडित, १३१६) • सह्याद्रि-महात्म्य (रवळोबास, १३५६) • ऋद्धिपूरवर्णन (नारो बहाळिए, १४१८) • ज्ञानप्रबोध (पं. विश्वनाथ बाळापूरकर, १४१८) • महदंबेचे धवळे (१२८६) • चरित्र अबाब वर दिलेल्या सूचीतील पहिल्या सात ग्रंथांना महानुभाव पंथामध्ये खास मानाचे स्थान असून ते सामूहिकपणे "साती ग्रंथ" या नावाने ओळखले जातात. महानुभावी वाङ्मय : एक मूल्यमापन[संपादन] महानुभाव पंथाच्या वाङ्मयीन कालमर्यादेच्या दृष्टीने इ. स. १३५० ते १६८० हा कालखंड म्हणजे त्या वाङ्मयाचा उत्तररंग ठरत असला तरी त्याला उत्तररंगाचे वैभव मात्र नाही; कारण या पंथाच्या वाङ्मयाचा ‘पूर्वरंग’ अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. वि. ल. भावे यांच्या महानुभाव वाङ्मयसूचीचे अवलोकन केल्यास आजमितीस त्याचा निम्माशिम्मा भागही प्रकाशित झालेला नाही हे लक्षात येते. त्यांच्या सूचीत नोंदलेले भाष्यग्रंथ, स्थळग्रंथ, लक्षणग्रंथ, टीपग्रंथ इत्यादी ज्या दिवशी मुद्रणाचा संस्कार घडून उपलब्ध होतील, त्या दिवशी या कालखंडाच्या संपन्नतेचा नेमका साक्षात्कार होऊ शकेल. महानुभाव पंथाने मराठी भाषेला ‘शास्त्र काट्याची कसोटी’ प्राप्त करून दिली आहे.

वारकरी संप्रदाय (संकलीत लेख,मराठी विश्वकोश )

वारकरी संप्रदाय : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल.येरझारांमध्ये जी वारंवारता आहे, तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या ⇨ विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी ⇨ पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले. वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे. हा संप्रदाय ⇨ भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास 'भागवत धर्म' असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात ⇨ विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास 'दक्षिण द्वारका' असे संबोधण्यात येते. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे 'विठ्ठल'चे (विठूचे) उद्भ्रषष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे. [⟶ विठोबा]. वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे. पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच. गीता, ⇨भागवतपुराण, ⇨ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील ⇨संत एकनाथकृत⇨एकनाथी भागवत, भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि ⇨ तुकारामांची अभंगगाथा, हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड (प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय) असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षेची पद्धत अशी : ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फडप्रमुखाकडे जावयाचे. तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो. हे नियम असे आहेत : १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच 'रामकृष्णहरी' ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल' ह्या गजरात गळ्यात घालतो. दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही. वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गो पी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत. प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत ⇨नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड,त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर, आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत. पंढरीची वारी : पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक मोटारीने वा आगगाडीसारख्या वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच; परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्रीपांडुरंगाचे व पुंडलिकाचे दर्शन घेतात. पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मग गावप्रदक्षिणा होते. उरलेला वेळ भजन-कीर्तनात जातो. इतर तीर्थांच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य, म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत, श्राद्ध, मुंडण हेही नाही. आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. रात्री हरिजागर होतो. प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला, तरी इतर फडांवरचे कीर्तन वा भजन ऐकायला कोणालाच मज्जाव नसतो. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असे कार्यक्रम चालु असतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. सतराव्या शतकात (१६६६) त्याचे बांधकाम सुरू झाले होते. शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी हे मंदिर बांधावयास आरंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखांत घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. घरी गेल्यावर कानवल्यांचे (मुरडीव) भोजन करतात. इतके झाले म्हणजे यात्रा संपते. विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळकाल्याचे महत्त्व फार आहे. हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पूषन् ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंभ ह्यांच्यांत काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत. पंढरपूरचा विठ्ठलही ताकपिठाने संतुष्ट होतो. पंढरपूर येथील विठोबाच्या देवळाच्या पश्चिमेस एका बोळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्धच आहे. पूषन् ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली, तर त्याचे वर्णन गोपवेषधारी कृष्णाची आठवण करून देते. वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते. त्याने कांबळे परिधान केलेले असते. तो गाईगुरांची खिल्लारे राखतो आणि गोपजनांना वाट दाखवतो . वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात, हे वर म्हटलेच आहे. श्रोत्यांच्या मनांत भक्तिरसाचा परिपोष करणे, तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे महत्त्वाचे हेतू आहेत. थोर संत आणि वारकरी नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ' नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ' ही नामदेवांची भूमिका होती. भजनकीर्तनांच्या योगे विठ्ठलाची किर्ती त्यांनी भारतात अनेक ठिकाणी हिंडून पोहोचविली. सु.५४ वर्षे ते पंथप्रचारासाठी झटले. पंजाबात तर अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवांनी हिंदी भाषेत रचले ली ६१ पदे शिखांच्या ⇨ ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनापेक्षा वेगळे असते. त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो. वारकरी कीर्तनाचीही पुर्वीची पद्धत आणि आजची पद्धत ह्यांत थोडा फरक आहे. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि मग कीर्तनास आरंभ करायचा, ही जुनी पद्धत होती. वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुवा जोग ह्यांनी ही पद्धत बदलली, कारण अशी कीर्तनपद्धती गावोगावी अवलंबिणे शक्य नव्हते. वारकरी कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग, असे दोन भाग विष्णुबुवा जोगांनीच केले. मुळात वारकरी कीर्तने नदीच्या वाळवंटात होत, ह्याचे पुरावे संतांच्या अभंगांतून मिळतात. कीर्तनात निरूपण असल्यामुळे त्या कीर्तनास कीर्तन म्हणण्याऐवजी निरूपण म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायात आहे. वारकरी कीर्तन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकऱ्यांचे भजन चालू असते. हातात वीणा घेतलेला एक वारकरी निरनिराळ्या संतांचे अभंग सांगतो आणि इतर ते म्हणतात. कीर्तनकार बुवा आल्यानंतर ते वीणेकऱ्याला व श्रोत्यांना नमस्कार करून वीणा स्वतःच्या गळ्यात घालतात. नंतर'जयजय रामकृष्ण हरी' च्या घोषात कीर्तन चालू होते. नमनाला ज्ञानदेवांचा 'रूप पाहतां लोचनी। सुख जालें वो साजणी' हा किंवा संत तुकारामांचा 'सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी' हा अभंग घेतात. त्यानंतर निरूपणाचा अभंग सुरू होतो. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग निरूपणासाठी घ्यायचे, असा दंडक आहे. तथापि संत रामदासांचे अभंग निरूपणासाठी कधीही घेतले जात नाहीत. त्याचप्रमाणे जेथे कीर्तन करायचे, तेथे अन्न घ्यायचे नाही, असाही दंडक आहे. निरूपणाचा अभंग म्हणून झाल्यानंतर एखादा वारकरी बुवांच्या सांगण्यावरून तोच अभंग रागदारीत गातो. हे अभंगगायन चालू असताना कीर्तनकार बुवांनी आरंभी ज्याच्या हातून वीणा घेतलेली असते, तो वीणेकरी बुवांच्या हातून वीणा घेऊन आपल्या गळ्यात घालतो. कीर्तनाच्या गादीचा मान म्हणून वीणा देताघेताना बुवा व वीणेकरी एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी कीर्तनात वीणेचे महत्व विशेष आहे. भजन संपल्यानंतर 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' असा घोष करतात. शेवटी निरूपणाच्या अभंगाचा भावार्थ बुवा सांगतात. येथे कीर्तनाचा पूर्वरंग संपतो. उत्तररंगात निरूपणाच्या अभंगाचे सखोल आणि सविस्तर विवेचन केले जाते. नारदीय कीर्तनातील उत्तररंगात आख्यान लावण्याची पद्धत आहे, तशी ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात नाही. सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर आणि बाबामहाराज सातारकर, हे थोर वारकरी कीर्तनकारांपैकी काही होत. वारकरी संप्रदायातील फडांचा उल्लेख पूर्वी येऊन गेला आहे. एकनाथ व तुकोबा ह्यांच्या पूर्वी फड असावेत; परंतु वारकरी संप्रदायातील एक संत विठोबा पिंपळनेरकर ह्यांच्या शिष्याचे शिष्य, वाशीचे मल्लाप्पा वासकर (१६३१-१७२१) ह्यांनी फडांना प्रथम संघटित स्वरूप दिले. ह्या फडाला वारकरी पहिला मान देतात. त्यानंतर देहूकरांचा फड निघाला. अझरेकर, बेलापूरकर, ठाकरबुवा, गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा कऱ्हाडकर, दादामहाराज सातारकर, बंकटस्वामी इत्यादींचेही फड आहेत. वारकरी संप्रदायात पालख्यांचा सोहळा असतो. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या हैबतरावबाबा आरफळकर ह्यांनी तो वाढविला. त्यांच्या पूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात घालून दिंडी पंढरपूरला नेली जाई. आरफळकर हे सातारा जिल्ह्यातले.वारकऱ्यांत प्रसिद्ध असलेली भजनीमालिका ह्यांचीच. हैबतरावबाबांना खंडोजीबाबा नावाच्या एका सज्जनाची खूपच मदत होत असे. त्यांची समाधी पुण्याला आहे. ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जाणाऱ्या अन्य संतसज्जनांच्या पालख्या अशा (त्या त्या संताची वा सत्पुरुषाची पालखी कोठून निघते हे त्या त्या संताच्या वा सत्पुरुषाच्या नावासमोर कंसात दिलेले आहे) : निवृत्तिनाथ (त्र्यंबकेश्रर), तुकाराम महाराज (देहू), एकनाथ (पैठण),सोपानकाका (सासवड), मुक्ताबाई (एदलाबाद), नामदेव(पंढरपूर), नरहरी सोनार(पंढरपूर), जनार्दनस्वामी (औरंगाबाद), जयरामस्वामी (वडगाव), शेकूबोवा (शिरसावडी), घाडगेबोवा (कोळे), तपकिरीबोवा (चिंचगाव), मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), रोहिदास (पंढरपूर), संताबाई (पंढरपूर), चोखोबा (पंढरपूर), चोखोबा बंका (मेहुणपुरा), दामाजी (मंगळवेढे), रुकमाबाई (कोंडणपूर-अमरावती), शंकर महाराज (माहुली-अमरावती), गोरखनाथ(शिराळा) इत्यादी. वारकरी संप्रदायाचा इतिहास : हा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. ⇨संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) 'संतकृपा जाली । इमारत फळा आली' ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे, ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत तुका जालासे कळस । भजन करा सावकाश तथापि पंढरपूरची वारी ही ज्ञानदेवांच्या पूर्वीही चालू होती, असे दिसते. ज्ञानदेवांचे वडील बरीच वर्षे पंढरीची वारी करीत असत, असे म्हटले जाते. पंढरपूर येथे विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आले ह्याचा निश्चित निर्णय होऊ शकला, तर ती बाब वारकरी सप्रंदायाच्या आरंभाचा काल निश्चित करण्यास साहाय्यभूत होऊ शकेल, आईवडिलांची परमभक्ती करणाऱ्या पुं डलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव पंढरपूरला आला, तेव्हा पुं डलिक आईवडिलांची चरणसेवा करीत होता, ती पुर्ण होईतो देवाने थांबावे, अशी विनंती त्याने केली आणि देवाला उभे राहण्यासाठी एक विट फेकली. ह्याच विटेवर कटी कर ठेवून देव विठ्ठलरूपाने उभा राहिलेला आहे, अशी सर्व संतांची श्रद्धा आहे. श्रीविठ्ठलाच्या कमरेवर हात ठेवण्याचे स्पष्टीकरण असे देतात, की भवसागर हा कमरेइतक्या पाण्यातून तरून जाता येईल इतका सोपा आहे, असे आश्वासन पांडुरंग आपल्या भक्तांना देत आहे. श्रीविठ्ठल पंढरपुरात कसा प्रकट झाला, ह्यासंबंधीची पुंडलिकाशी संबंधित अशी कथा हेमाद्रीपूर्व स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे, परंतु अभ्यासकांनी खूप धडपड केल्यानंतरही हा पुं डलिक त्यां ना इतिहासात सापडलेला नाही. त्यामुळे विठ्ठलमंदिराच्या उभारणीचा कालनिर्णय करण्यासाठी पुंडलिकाची कथा उपयोगी पडत नाही . पंढरपूरची तीन संस्कृत स्थळपुराणे आज उपलब्ध आहेत: (१)स्कंद पुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (स्कांद पांडुरंगमाहात्म्य), (२) पद्मपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (पाद्म पांडुरंगमाहात्म्य) आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य, ह्या तीन स्थळपुराणांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे निवृत्ति-ज्ञानदेवादी संतांच्या उदयापूर्वी आणि काटेकोरपणे सांगायचे, तर हेमाद्री पंडितापूर्वी रचिले गे लेले आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसंभार प्रथमतः ह्याच ग्रंथामुळे स्थिर पायावर उभा झाला आहे, असे दिसते. देवगिरीचा राजा श्रीरामदेवराव यादव ह्याचा करणाधिप हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत ह्याने रचिलेल्या ⇨चतुर्वर्गचिंतामणी (रचनाकाल १२६० ते १२७० च्या दरम्यान) ह्या ग्रंथाच्या 'तीर्थखंडा'त स्कांद पांडुरंगमाहात्म्यातील श्लोक अंतर्भूत होते. चतुर्वर्गचिंतामणीचा तीर्थखंड आज अनुपलब्धच असला, तरी हे श्लोक हेमाद्रीने त्यात उद्धृात केले होते, हे दाखविणारा पुरावा मिळतो. त्याचा विचार करून म. म. काणे ह्यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या चौथ्या खंडात पंढरपूरविषयी चर्चा करताना म्हटले आहे, की १२६० पूर्वी अनेक शतके पंढरपूरचा तीर्थमहिमा गाजत होता आणि भक्त पुंडलिकाची कथा तेव्हाही प्रसिद्ध होती. ह्यावरून हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे आणि वारकरी पंथही बराच प्राचीन असला पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. ह्या पार्श्वभूमीवर'ज्ञानदेवे रचिला पाया' ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ह्याचा अर्थ ह्या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले, तसेच त्यांच्या रूपाने ह्या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत येऊन मिळाला, असा घेता येईल. वर्णाश्रमधर्माच्या चिवटपणाचा अत्यंत कटू अनुभव ज्ञानेश्वरांना, त्यांच्या आईवडिलांना आणि भावं डांना आलेला होतो. समाजाने झिडकारणे किती दुःखद असते, ह्याचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला होता आणि ह्यातूनच समाजातील शुद्रातिशूद्रांबद्दल त्यांच्या मनात अपार करूणा निर्माण झाली. वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेला आणि 'ब्रह्यविद्येचा सुकाळू' करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सर्वांसाठी मराठी भाषेत लिहिला. अध्यात्मविद्या ही काही मूठभरांची मक्तेदारी नसून सामान्यांतला सामान्य माणूसही ती आत्मसात करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी पारंपरिक समाजव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या माणसांतही निर्माण केला. ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा नाथपंथीय होती. अद्वयानंदाचे वैभव, अष्टांगयोग, दलितांच्या उद्धाराची प्रेरणा आणि देशी-मराठी-भाषेचा पुरस्कार, हा नाथपंथाचा प्रभावशाली वारसा होय. शांकर वेदान्त आणि काश्मिरी शैवमताचे संस्कारही त्यांच्यावर होते. तथापि ह्या संस्कारांतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जीवनाविषयक दृष्टिकोण निर्माण केला. ज्ञानदेवांचेच समकालीन नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होत. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. महाराष्ट्राबाहेरही त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भक्कम पाया मिळवून दिला. नामदेवांची भूमिका तत्वचिंतकाची नसली, तरी लडिवाळ लेकराने मातेवर प्रेम करावे, तशी ईश्वरभक्ती करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजनसमाजा च्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आत्माविष्काराची वाट मोकळी करून दिली. विठ्ठलभक्तिने भारलेले विविध जातींचे लोक विठ्ठलभक्तिने भारा वलेल्या रचना करू लागले. ⇨गोरा कुंभार (१२६७-१३१७), ⇨सावतामाळी (१२५०-९५), ⇨ नरहारी सोनार (मृ.१३१३), ⇨ चोखामेळा (मृ.१३३८), ⇨ सेना न्हावी (तेरावे शतक) इ. संतांची एक मालिकाच उभी राहिली. वेगवेगळ्या व्यवसायांतले हे संत होते आणि त्यांनी आपल्या अभंगरचनेसाठी आपापल्या व्यवसायातली परिभाषा वापरली वा आपापल्या व्यवसायांचे संदर्भ दिले. उदा, केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिकेमाझारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त (गोराकुंभार) कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा (सांवता माळी) देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस (नरहरी सोनार) आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत (सेना न्हावी) संतश्रेष्ट चोखामेळा जातीने महार. त्यांचे सारे कुटुंब-पत्नी सोयरा, बहिण निर्मला, मुलगा कर्ममेळा व मेहूणा बंका-विठ्ठलभक्त होते. तथापि चोखामेळा ह्यांच्या अभंगांतून सामाजिक विषमतेमुळे त्यांना बसत असलेले चटके स्पष्टपणे दिसुन येतात. उदा., हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा । मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ।। चातुर्वर्ण्य, जातपात, सोवळेओवळे, विटाळ ह्यांतून पदरी येणारी मानहानी सोसत असतानाच त्यांनी त्याबद्दल आपला निषेधही व्यक्त केला. ज्यालात्याला लाभलेला जड देह आणि चैतन्यमय आत्मा हे मुळातच भिन्न आहेत. पंचभूतात्मक देहामुळे विटाळ निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या देहात जन्मापासून मरेपर्यत विटाळच साचून राहिलेला असताना 'सोवळा वोवळा तो कोण?' आणि ‘विटाळापरते आहे कोण ?’ असा मार्मिक प्रश्न त्यांनी एका अभंगात विचारला आहे. 'आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध । देहाचा विटाळ देहीच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ।।' असे उद्‌गार चोखामेळ्यांच्या पत्नी सोयराबाई ह्यां नीही एका अभंगात काढले आहेत. वारकरी संतां नी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापी आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली . देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ' ह्या तुकोबांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे. चोखोबांच्या समाधी पुढे संत एकनाथ नतमस्तक झाले, तसेच अन्य वारकरीही होतात. वर्णाश्रमधर्माच्या कठोर चौकटीचा जाच ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांनाही सोसावा लागला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली नाही; ब्राह्मणही मानले नाही . तथापि त्या काळातील परिस्थितीचे भान ठेवून ज्ञानेश्वरांनी केवळ धार्मिक जीवनातच समता आणण्याचा प्रयत्न केला . बौद्ध-जैनांनी चातुर्वर्ण्याविरुद्ध केलेले बंड अयशस्वी झाल्याचेही त्यां ना दिसले होते. समाजरचनेशी निगडीत असलेली तत्कालीन अर्थव्यवस्थाही केवळ विचारांच्या परिवर्तनाने मुळापासुन बदलता येणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त धार्मिक क्षेत्रातील भेदभाव नष्ट करण्याची भूमिका घेऊन बहुजनसमाजाच्या आध्यात्मिक विकासासाठी त्यां नी वारकरी पंथाला वेगळे वळण दिले. ज्ञानदेव-नामदेवांनंतर मात्र जवळपास अडीचशे वर्षाचा काळ एखाद्या तमोयुगासारखा गेला. देवगिरीच्या यादवांचे राज्य गेले आणि इस्लामी सत्तेचा अंमल सुरू झाला. बहमनी राज्य आणि विजयानगरचे राज्य ह्यांच्यात सतत चाललेल्या लढायांमुळे शांतता आणि स्वास्थ्य मिळेनासे झाले. ह्याचा परिणाम वारकरी संप्रदायावरही झाला. ज्ञानदेव-नामदेवांनी चालविलेल्या कार्याची आध्यात्मिक धुरा समर्थपणे खांद्यावर घेऊन ते पुढे नेईल, असा महान संत ह्या काळात झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे नाव घेण्यासारखा थोर ग्रंथही रचिला गेला नाही, तथापि विजयानगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर आणि बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच वेगवेगळ्या शाह्या निर्माण झाल्यानंतर परिस्थितीत बदल घडून आला. ह्या शाह्यांतील वैमनस्यामुळे मराठे जहागिरदार आणि मुत्सद्दी ह्यांचे सहकार्य मिळविण्याची गरज त्यांना वाटू लागली. त्यामुळे मराठ्यांच्या पराक्रमास वाव मिळाला. त्यां चा आत्मविश्वास वाढला. वातावरणात झालेल्या ह्या परिवर्तनामुळे धर्माच्या क्षेत्रातही उत्साहाचे वारे वाहू लागले. एकनाथांच्या कार्याला ह्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती. श्रीज्ञानदेवांची गुरूपरंपरा जशी नाथपंथाची, तशीच एकनाथांची दत्तसंप्रदायाची होती. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी हे दत्तोपासक होते, परंतु विठ्ठलभक्त्तीची कौटुंबिक परंपराही त्यांच्या पाठीशी होती. एकनाथांचे पणजे संत भानुदास (१४४५-१५५३) हे विठ्ठलभक्त होते. 'आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ।। ' असे उद्‌गार त्यांनी आपल्या एका अभंगात काढले आहेत. भानुदासांच्या बाबतीत एक आख्यायिका अशी आहे, की विजयानगरचा राजा कृष्णराय ह्याने पंढरपूरची विठ्ठलमूर्ती विजयानगरला नेली होती; परंतु संत भानुदासांनी ती परत आणली. स्वतः एकनाथांनी भानुदासांविषयी जी माहिती दिली आहे, तीत विजयानगरहून विठ्ठलमूर्ती परत आणल्याची हकिकत नाही, पण भानुदासांच्या जवळजवळ समकालीन असा राजा कृष्णराय ह्याची वृत्ती निरनिराळ्या ठिकाणांहून देवमूर्ती आणून त्यांची विजयानगरात स्थापना करण्याची होती, ह्याबद्दल विपुल पुरावा मिळतो. कदचित भानुदासांना त्याने त्या मूर्तीसारखीच दुसरी मूर्ती तयार करुन दिली असणे शक्य आहे, असे मत ग. ह. खरे ह्यांच्यासारख्या इतिहास संशोधकानी व्यक्त केले आहे. विठ्ठलभक्तीची पार्श्वभूमी पाठीशी असल्यामुळे, एकनाथां च्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातही भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीत सांगून तो सर्वसामान्यांपर्यं त पोहोचविण्याची कामगिरी ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवतपुराण मराठीत आणण्याचा उद्योग केला. ह्या उद्योगास पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांचा असलेला विरोध नाहीसा करून नाथांनी एकनाथी भागवत काशीतच पुर्ण केले. हे देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । हे टीका तरी मराठी । ज्ञानदाने होईल लाठी ।। असे उद्‌गार नाथांनी एकनाथी भागवतात काढलेले आहेत. त्याचप्रमाणे 'संस्कृत भाषा देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली?' असा सवालही त्यांनी विचारला आहे. तथापि एकनाथांनी संस्कृतचा अनादर कधीच केला नाही. उलट त्या भाषेतील शब्दांचे ऐश्वर्य मराठीला श्रीमंत आणि भारदस्त करण्यासाठी त्यांनी उपयोगात आणले कटुता आणणारा अभिनिवेश न बाळगता नव्याजुन्यांचा मेळ घालण्याची जी शक्ती नाथांच्या ठायी होती, तिच्यामुळेच सनातन्यांना न दुखविता ते त्यांच्या सद्भामवनेस हात घालू शकले. एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीचा जीर्णोद्वार केला, तसेच ज्ञानेश्वर-नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्धे शिरलेली ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. ह्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे, की ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी असलेल्या अजानवृक्षाची मुळी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याशी अडकली आहे, असा दृष्टांत एकनाथांना ते आळंदीस असताना स्वप्नात झाला. जागे होऊन ते समाधीजवळ गेले तेव्हा स्वप्नात जे दिसले, ती वस्तुस्थितीच असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळेच ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्वार करण्याची, तसेच ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध करण्याची प्रेरणा त्यां ना मिळाली. ह्या आख्यायिकेतील अजानवृक्ष म्हणजे एकनाथांच्या काळी ज्ञानेश्वरीबाबत जनतेत पसरलेले अज्ञान होय, असा अर्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी लाविला आहे. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेत पुन्हा कोणी बदल करण्यास धजावू नये, म्हणून एकनाथांनी इशारा देऊन ठेविला,की'ज्ञानेश्वरीपाठी । जो वोवी करील मऱ्हाठी । तेणे रत्नखचिताचिया ताटी । जाण नरोटी ठेविली ।। ' लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे वैशिष्टय होय. एकनाथांच्या जीवनातूनही ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थविचाराच्या व्यापक प्रसारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे, हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत, तर परमार्थविचार जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केली, ⇨भारूडासारख्या लोककाव्याचेही पुनरूज्जीवन केले. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन ह्यांची उत्तम सांगड घातली. विनोदाचाही वापर केला. कोल्हाटी डोंबारी, भुत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इ. समाजाच्या विविध थरांतील लोकांच्या दैनदीन कर्मांच्या वा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री-शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणे आणि दुःखितांची कणव करणे, हे त्यांनी आयुष्यभर केले. महाराच्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचविणे, महाराच्या घरी जेवावयास जाणे, दोनचार भुकेले महार दिसताच वडिलांच्या श्राद्धासाठी केलेला स्वयंपाक त्यांना खाऊ घालणे, काशीहून आणलेली गंगा तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या मुखी घालणे इ. अनेक कथा त्यांच्यासंबंधी प्रचलित आहेत. परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही, हे एकनाथांनी स्पष्ट केले आहे. ‘प्रपंचपरमार्थी सावधान । उभयता दीसो नेदी न्यून ’ असं त्यांनी म्हटले. समाधीबद्दलचीही त्यांची कल्पना वैशिष्टयपूर्ण आहे. ताटस्थ्य म्हणजे समाधी नसून ती नुसती मूर्च्छा आहे. धकाधकीच्या जीवनात जी भंग पावत नाही, ती खरी समाधी होय, अशी त्यांची धारणा होती. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करीत असताना संत बहिणाबाईंनी ‘तुका झालासे कळस ’ असे सार्थ उद्‌गार काढले आहेत. कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती. अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमुर्ती म्हणजे तुकाराम, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी म्हटले आहे. तुकारामांच्या जीवनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू, आध्यात्मिक प्रवासाचा एकेक टप्पा पार करीत'अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा।। ' अशी प्रचीती घेण्याइतके मोठे झाले. अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवीत त्यांनी सामान्यांना परमार्थबोध केला. त्यांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचीच भूमिका व्यक्त झालेली आहे : भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार । उधार घ्यारे उधार घ्यारे। अवघे या रे जातीचे । येथे पंक्ति भेद नाही। मोठे काही लहान । तुका म्हणे माल घ्यावा । मुद्दल भावा जतन ।। उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती ह्यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे. तुकोबांनी आपल्या अभंगातून तेच संस्कार जनमानसावर केले. तुकोबांच्या अनुयायांत अनेक जातींचे लोक होते आणि त्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या प्रमुख सोळाजणांत नऊ ब्राह्मण होते, ही बाबही लक्षणीय आहे. निळोबा पिपंळनेरकर (मृ. सु. १७५३) हे तुकारामांचे परमभक्त होत. ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूरचा, परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर ह्या गावी ते स्थायिक झाल्यामुळे पिं पळनेरकर म्हणून ओळखले जाऊ लागले. तुकारामांना त्यानी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. परंतु त्यानी तुकोबांची परंपरा पुढे चालविली. त्यानी लिहिलेल्या अभंगां ची संख्या सु. १,३०० भरेल. वारकरी पंथातले शेवटचे अधिकारी संतकवी म्हणून ते मानले जातात. महीपती बोवा ताहराबादकर ऊर्फ ⇨महीपती (१७१५-९०) हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे ग्रंथकार होत. संतांच्या आणि भक्तांच्या चरित्राचे लेखन त्यांनी केले. कुलकर्णी, अ. र. तत्त्वज्ञान : वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे; म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्त्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही. भक्तिरसात न्हालेल्या संतांचा अनुभव, हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण होय. सकृद्दहर्शनी असे वाटते, की भक्तीचे समर्थन करणारे तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखे द्वैतवादी असावयास हवे. देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करावयाची कशी ? केवलाद्वैत वेदान्ताच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्याच केवळ सत्य असले आणि मीच ब्रह्मा असेन, तर भक्ती करावयाची कोणी आणि कुणाची? ही अडचण वारकरी संतांस वाटली नाही. त्यांना स्वसंवेद्न आत्मतत्वाचे अद्वैत मान्य होते. भक्ती हा केवळ त्या अद्वैताचा अनुभव घेण्याचा मार्ग होता असे नाही, तर त्या अनुभवाच्या मुक्कामाला पोहोचल्यावरसुद्धा भक्तीसुखाचा सोहळा त्यांना हवा होता. 'मोक्ष तुमचा देवा । दुर्लक्ष तो तुम्ही ठेवा । मज भक्तीची आवडी ।' असे तुकारामांनी म्हटले आहे. भक्ती हा पाचवा पुरषार्थ आहे आणि तो परमपुरषार्थ आहे. 'चहू पुरूषार्थाचे माथा । भक्ती सर्वथा मज पढियंती ' असे नाथांनी म्हटले आहे (एकनाथी भागवत ११.६६७). ज्ञानेश्वरीत (१८.८६७) म्हटले आहे, 'चहू पुरूषार्था शिरी । भक्ती जैसी ' तेव्हा ह्या परमपुरूषार्थाचे समर्थन करणे, हे वारकरी तत्त्वज्ञानाचे प्रधान प्रयोजन आहे, अनुभवामृतात ज्ञानेश्वरांनी अशा आशयाची ओवी लिहिली आहे की, एकच डोंगर कोरून त्यातून देव, देऊळ व परिवार निर्माण करतात, त्याच रीतीने एकाच आत्मतत्त्वाच्या विलासातून भक्तिचा व्यवहार होऊ शकतो. हा चिद्विलासवाद म्हणजेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान होय. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ म्हणजे, या तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी होय असे सांप्रदायिक म्हणतात, पण हा उपचार आहे. या ग्रंथांतून ते तत्त्वज्ञान अनुस्यूत आहे, असे म्हणता येईल, पण युक्तिवादपूर्वक, थोडासा पूर्वोत्तरपक्ष करून त्याची पद्धतशीर मांडणी ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केलेली आहे. सारांशाने ते तत्त्वज्ञान असे : सर्वत्र केवळ एका आत्मतत्त्वाचे-म्हणजे चैतन्याचे-स्फुरण आहे. ते स्वसंवेद्य आहे.म्हणजे त्याच्या अस्तित्वाला कोणताही बाह्य पुरावा लागत नाही. त्यास ‘असत् ’ असे म्हणताच येणार नाही. कारण जो म्हणणारा तेच आत्मतत्त्व होय. त्याच्या अभावाचे भान होणार नाही. कारण भान (चित्) हेच त्याचे स्वरूप होय. हे चैतन्य आनंदरूप आहे, असा संतांचा अनुभव आहे. पण कापरामध्ये ज्याप्रमाणे शुभ्रता, सुगंध व मृदुता ही एकमेकांहून विलग नसतात, त्याच रीतीने चैतन्य, असतेपणा व आनंद ही आत्मतत्त्वात एकरूप असतात. हे आत्मतत्त्व एक असले, तरी क्रीडेसाठी देव आणि देवी या स्वरूपात ते आविष्कृत होते. जगताची ही मातापितरे आवडीमुळे एकमेकांत मिळतअसतात. त्यांच्यापासून जगाची निर्मिती होते. शंकराचार्याच्या अद्वैत वेदान्तात मानले आहे, की सच्चिदानंद-स्वरूपी ब्रह्मास अज्ञानाची उपाधी आहे आणि जगत् हे त्या भावरूप अज्ञानाचे कार्य आहे. पण ज्ञानेश्वरांनी या अज्ञानाचा 'धांडोळा' घेऊन त्याचे जगत्कारणत्व नाशाबीत केले आहे. अज्ञानाला कारण मानल्यास त्याचा आश्रय सांगावा लागेल. चैतन्य किंवा ज्ञान हा त्याचा आश्रय आहे, असे म्हणणे म्हणजे प्रकाशाला टेकून अंधार उभा आहे, असे म्हटल्यासारखे होईल. जगत् हे अज्ञानमुलक नसल्याने ते असत्य अथवा मिथ्या नाही. ते चैतन्याचा विलास आहे. स्वप्रीत्यर्थ ते नित्य नव्या रूपाने प्रगट होते. पाणी स्वतःमध्ये कल्लोळ निर्माण करून खेळत असते. तो कल्लोळ मिथ्या नव्हे अथवा पाण्याहून अन्य नव्हे. पाणी पाण्यास पिऊ शकत नाही. तृष्णेचे समाधान करण्याचे सामर्थ्य अंगी असूनही पाण्यास ते समाधान अनुभवता येत नाही. द्वैताची अपेक्षा आहे. चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाचा अथवा प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी जीवरूपाने ते प्रकट होते. जीवाला अहंभाव टाकून तद्रूप झाल्याशिवाय ते प्रेमसुख मिळत नाही. राजा असल्यानेच राजेपण उपभोगता येते. भक्ति हा बाह्य संबंध नाही. सुगंधच घ्राणेद्रिय झाले, असे उत्कट भक्तिचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. भक्तीचा हा अनुभव म्हणजे परमपुरूषार्थ होय. या भक्तिची गोडी एकांतात नसून संतांच्या संगतीत आहे. 'नलगे मुक्ती, धनसंपदा । संतसंग देई सदा । ' ही तुकारामांची उक्ती सर्वपरिचित आहे. 'झणी मुक्तीपद देशी पांडूरंगा । मग या संतसंगा कोठे पाहू । ' असे नामदेवांनी म्हटले आहे. लोकप्रियता : वारकरी संप्रदायाला जी अमाप लोकप्रियता मिळाली, तिची काही स्पष्ट कारणे आहेत. सर्वसामान्यांशी ह्या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले उत्कट भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती. नैष्कर्म्य आणि निष्क्रियता ह्यांत त्यांनी भेद केला. 'जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्यालागी ।।' असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे (ज्ञानेश्वरी १८.१५३). वाटसरूने चालताना जलद पाऊल ऊचलले, तर त्यामुळेच तो मुक्कामी लवकर पोहोचतो आणि त्याला विश्रांती मिळू शकते. त्याचप्रमाणे कर्माचे भरपूर आचरण नैष्कर्म्याच्या कामी येते. असा ह्या ओवीचा अर्थ आहे. जनाबाईच्या दळणकांडणादी नित्यकर्मात प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना मदत करावी किंवा एकनाथांच्या दारी पांडूरंगाने श्रीखंड्या होऊन राहावे, ह्या आख्यायिका ह्या संदर्भात बोलक्या आहेत. वारकरी संप्रदायाने ज्ञानाचे महत्व कमी आहे, असे कधीच मानले नाही, परंतु भक्तीला अग्रस्थान दिले. केवळ नामसंकीर्तनानेही ईश्वराच्या जवळ जाता येते, हे आत्मविश्वासाने प्रतिपादिले. 'नलगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।' असे तुकोवांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाने अग्रस्थान दिलेल्या भक्तिभावनेचा अत्यंत उत्कट आविष्कार संत नामदेवांच्या रूपाने पहावयास मिळतो. एखाद्या लडिवाळ लेकरासारखे ते ईश्वराजवळ जाऊ पाहतात. देवावर रुसणे, त्याच्याकडे हट्ट धरणे, पुन्हा त्याची करुणा भाकणे, अशा अनेक भावावस्था त्यांच्या अभंगांतून आपल्याला दिसतात. एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा समन्वय साधण्यावर भर दिला. वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्वसंग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल, तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इ. विविध धर्मधारांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधला आहे. असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा नाथपंथीयांची होती, पण लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नाथपंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ निवडला नाही, तर गीतेची निवड केली. वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही. ' तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात ' ही तुकारामांची उक्ती प्रसिद्ध आहे. तुकारामांच्या आधी होऊन गेलेल्या एकनाथांनीही सनातन्यांना न दुखावता त्यांच्या सद्भा वनेला हात घालण्याची धडपड केली. वारकरी संतांनी राजाश्रयाची आस कधीही धरली नाही. शिवाजी महाराजांचे आमंत्रण येताच ' दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ' आणि 'राजगृहा यावे मानाचिये आसे । तेथे काय वसे समाधान ? अशी प्रतिक्रिया तुकारामांनी अभंगां तून दिली. सामान्य माणूस हाच ह्या पंथाचा कायम आधार राहिला. लोकसंग्रह हे ह्या पंथाचे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक वारकरी आपापली कामे करूनच उदरनिर्वाह करीत असल्यामुळे भिक्षावृत्तीला ह्या पंथात थारा नाही. ह्या पंथाने तत्त्वचर्चेकडे पाठ फिरवली नाही आणि अंधश्रद्धेवरही आघात केले. अज्ञानावर आधारलेल्या उपासनेचा त्यांनी निषेध केला. वारकरी पंथाने देशी भाषेला जे महत्त्व दिले, ते महानुभाव पंथीयांनीही दिले होते. बौद्ध, जैन, लिंगायत ह्यांनीही देशी भाषेचा पुरस्कार केला होता. तथापि आपल्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वारकरी पंथीयांनी मराठी भाषेच्या जोडीला स्वतःचे असे एक तंत्र उपयोगात आणले. श्रोत्यांबद्दलचा आदरभाव त्यांनी कायम मनात बाळगला. ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य असले, तरी तो एक श्रोतृसंवादही आहे. श्रोत्यांमुळे आपले वक्तृत्व फुलते, हीच भूमिका ज्ञानेश्वर घेऊन आहेत. ' प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती ' असे त्यांनी एके ठिकाणी श्रोत्यांना उद्देशून म्हटले आहे. अन्य वारकरी संतांनीही श्रोत्यांशी समरस होण्यात धन्यता मानली. त्यामुळे इतर पंथीयांच्या तुलनेत वारकरी संतसाहित्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचले. ज्ञानेश्वरीत अपपाठ शिरले होते, ह्याचाच एक अर्थ असा, की ज्ञानेश्वरी गावोगावी अनेकांपर्यंत पोहोचली होती. वारकरी पंथाची ही सारी वैशिष्ट्ये त्या पंथाला जे सर्व थरांतील संतांचे असमान्य आध्यात्मिक नेतृत्व वेळोवेळी लाभत गेले त्यातून निर्माण झाली. ह्या संप्रदायाच्या अलीकडच्या काळातील थोर सेवेकऱ्यांमध्ये नानामहाराज साखरे, शं. वा. दांडेकर ऊर्फ सोनोपंत दांडेकर, भाऊसाहेब काटकर, विष्णुबुवा जोग, केशवराव देशमुख, बंकटस्वामी, धुंडामहाराज देगलूरकर, बाबामहाराज सातारकर अशा अनेकांचा समावेश होतो. प्रवचने, कीर्तने, ग्रंथप्रकाशन अशा विविध मार्गांनी त्यांनी ह्या संप्रदायाची सेवा केली. नानामहाराजांनी सार्थ ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केली, तर विष्णुबुवा जोगांनी तुकारामबोवांच्या अभंगांची सार्थ आवृत्ती काढली. विष्णुबुवांनी आळंदी येथे वारकरी शिक्षणसंस्थाही काढली (१९१७). संदर्भ : १. खरे, ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, आवृ. ३ री, पुणे, १९६३. २. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४. ३. दांडेकर, शं. वा. वारकरी संप्रदायाचा इतिहास, १९२७. ४. नेमाडे, भालचंद्र, ' वारकरी चळवळीची आविष्कारशैली ', टीकास्वयंवर, औरंगाबाद, १९९०. ५. पाठक, यशवंत, नाचू कीर्तनाचे रंगी, पुणे, १९८०. ६. सरदार, गं. बा. मराठी संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती, आवृ. ४ थी, पुणे, १९५२. कुलकर्णी, अ. र.

समर्थ रामदास (संकलीत,विकीपिडीया)

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र -इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.[१] पूर्वाश्रमीचा परिवार[संपादन] समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते निस्सीम सूर्योपासक होते. ते रोज 'आदित्यहृदय' या स्तोत्राचा पाठ करीत असत. गंगाधर व नारायण या त्यांच्या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या पत्नीजचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते. त्या संत एकनाथमहाराजांच्या नात्यातील होत्या. समर्थ रामदास स्वामींचे ज्येष्ठ बंधू गंगाधरस्वामी यांना सर्वजण त्यांना आदराने 'श्रेष्ठ ' असे म्हणत असत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. त्यांनी 'सुगमोपाय' नामक ग्रंथ लिहिला होता. बालपणी समर्थांनी त्यांनाच गुरुमंत्र देण्याचा आग्रह केला होता. भानाजी गोसावी हे समर्थ रामदास स्वामींचे मामा होते. ते उत्तम कीर्तनकार असून संत एकनाथांचे शिष्य होते. बालपण[संपादन] श्री समर्थ रामदासस्वामी(=नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थया गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला. बालपण एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजीपंतांकडे तपासणीसाठी आला. सूर्याजीपंत सधन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते. पण राहणी साधी असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सगळे काम खाली बसून करावे लागले. सूर्याजीपंतांचे काम उत्तमच होते. मात्र अधिकाऱ्याने जाताना एक शेरा मारला-'एवढे मोठे अधिकारी, पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही?' या शेरेबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान दुखावला . त्याने आपले ७-८ मित्र गोळा केले. लाकळी फळ्या, दगड, विटा, माती, हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या सहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखविली. त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले. नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते. याच ठिकाणच्या बोहल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला..श्रीक्षेत्र आसनगाव अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. तपश्चर्या आणि साधना[संपादन] पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. ... त्यांतील एक जण म्हणाला की, 'हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.' तर दुसरा मुलगा म्हणाला की,'मूर्ती शेणाची आहे'. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले - ' तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे'.जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ)रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास रामनामाचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. ते दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण[संपादन] समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा ' असे त्यांना वाटू लागले.... त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले. देहत्यागाच्या हेतूने त्यांनी १००० फुटांवरून मंदाकिनी नदीत उडी मारली, तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले, असा त्यांना भास झाला. तेव्हा असे म्हटले जाते की, रामरायाने त्यांना सांगितले - तुम्हास जगोद्धार करणे आहे | तुमची तनु ते आमुची तनु पाहे | दोनी तपे तुमची रक्षिली काय हे | धर्मस्थापनेकारणे || रामरायांनी समर्थांना सांगितले की, " तुम्ही या शरीराचे मालक नाही आहात. धर्माचे कार्य करण्यासाठी गेली दोन तपे म्हणजे २४ वर्षे आम्ही या शरीराचा सांभाळ केला आहे. तुम्हाला हे शरीर असे एकदम नष्ट करता येणार नाही".या घटनेनंतर समर्थ आपल्या शरीराची काळजी घेऊ लागले. त्यांच्या लक्षात आले की, रामाचा हा आदेश आपल्याला ऐकावा लागेल. आपणा सर्वांना भगवंताने हे शरीर दिले ते देश, देव व धर्म यांच्या सेवेसाठी. आपल्याला या शरीराचा दुरुपयोग करून नाही चालणार, शरीराचे फार लाडही करू नये आणि त्याची हेळसांडही करू नये. भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले.तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत.बाहेरून दिसायला कुबडी.जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे.कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत."समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली . हनुमान ही शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. जीवन[संपादन] भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले.पैठणला ते नाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले. मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे म्हणतात. तिने विचारले - ' नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?' त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले.समर्थ चार महिने जांबला राहिले.त्यांनी आपल्या आईला 'कपिल गीता' हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला. आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले. कराडजवळ शाहपूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. सतीबाईंची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यायचे असते. सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये. एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले. भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला.त्यामुळे सतीबाई समर्थांवर कडाडल्या आणि म्हणाल्या, - 'ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस. समर्थ मृदू शब्दात म्हणाले - 'आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते'. सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही. त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले. पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले. आठ दिवस हा प्रकार रोज घडत होता. नवव्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या. त्यांचे पती बाजीपंत यांचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते. त्या समर्थांना म्हणाल्या - 'तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली.' समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले - 'आजपासून ११ दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील'. पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले. यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते. समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करविली. सतीबाईंची समर्थांच्या अनन्य भक्त झाल्या. त्यांनी आपला मुलगा भीमस्वामी समर्थांना अर्पण केला. या भीम स्वामींनी तंजावरला तीन मठ स्थापन केले. परमात्म्याने समर्थांना जेवू घातले. समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. दाट झाडीत आणि रम्य वनश्रीत त्यांचे मन रमत असे. त्याबद्दलची ही आख्यायिका -- महाबळेश्वरला निसर्गाच्या कुशीत ते रमले.तेथील ब्रम्हारण्यात ते फिरत असताना रस्ता चुकले व जंगलातच फिरत राहिले. तीन दिवस समर्थ भटकत होते.पण त्यांना रस्ता काही सापडत नव्हता. कुठे फळझाडही आढळेना. त्यामुळे जेवणाची सोय नाही अथवा खाण्या-पिण्याचीही सोय नाही.तीन दिवसांनंतर एक अद्भुत घटना घडली.समर्थांना एक झोपडी आढळली.त्यांना खात्री पटली की, येथे जर कोणी राहत असेल तर आपल्या भोजनाची नक्की व्यवस्था होईल. झोपडीच्या बाहेर उभे राहून समर्थांनी भिक्षेचा श्लोक म्हटला. त्या झोपडीत एक दांपत्य राहत होते. त्या झोपडीतील गृहस्थाने समर्थांना घरात बोलावून भोजन करण्याची विनंती केली. समर्थांची पाद्यपूजा करावी अशी त्या दांपत्याची इच्छा होती.परंतु समर्थ म्हणाले - ' मी कधी पाद्यपूजा करून घेत नाही'. समर्थ पानावर बसले. त्या गृहिणीने अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने समर्थांना जेवायला वाढले. समर्थ देखील तीन दिवसानंतर जेवत असल्यामुळे पोटभर जेवले. त्या दांपत्याला मनःपूर्वक धन्यवाद देऊन समर्थ झोपडीतून बाहेर पडले. दहा-वीस पावले चालल्यावर त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर तेथे झोपडीच नव्हती. ती झोपडी आणि ते दांपत्य अदृश्य झाले होते. समर्थांचे अंतःकरण रामचंद्रबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले. त्यांच्या लक्षात आले की, ते दांपत्य म्हणजे प्रत्यक्ष राम-सीता होते. भगवंताने वेगळ्या रूपात प्रकट होऊन भक्ताची सेवा केली होती. ज्याने जनाबाईची लुगडी धुतली, नाथांच्या घरी पाणी भरले त्याच परमात्म्याने समर्थांना जेवू घातले. थोड्याच वेळात समर्थांना मुख्य रस्ताही सापडला. धोंडिबाच्या मनाची उन्मनी अवस्था झाली जीवनकार्य[संपादन] समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले - 'महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले - ' मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुझ्या हवे तसे होईल. 'धोंडिबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला.'आपण आता घरी जावे' असे त्याच्या मनात आले पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरविले. मग मनात आले, रानात जावे. पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे रानातही जाता येईना. धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात परस्परविरोधी विचार येत राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये. मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय? धोंडिबाच्या लक्षात आले की, मनात सतत विचार येत राहतात. ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडिबाने 'श्रीराम जयराम जय जय राम' हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो ७२ तास जप करीत राहिला. ७२ तासांनंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडिबाने ते ऐकले, आणि त्याचे भले झाले. (मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ईश्वरस्वरूपी मिळून जाणे!) अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. केल्याने होत आहे रे । आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्यात धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारुन खणखणीत वाणीने लोकांना सांगितले - धिर्ध्ररा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका । केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥ मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर सन्त एकनाथाच्यावाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थानबलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावूव गेले. आदिलशाहीत ही त्यांनी आपूलकी जोपासली होती. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते . अकरा मारुती[संपादन] सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती,शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसूरमारुती (ता. कराड) (८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि.कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर). संस्था[संपादन] स्वामी समर्थ रामदास यांचे नाव दिलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :- • स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडई, वांद्रे(मुंबई) संवत्सरी दुर्मती | सज्जनगडी हो इमारती | दोन सहस्र निष्क प्रीती |वेचिली राये || घर बांधिले विशाले | गृह प्रवेश करतीये वेले | वैशाख मासी भक्तपाले | प्रवेशले || तेव्हा बोलिले वचन | आम्हास राहाणे स्वल्प जाण || सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंग्लाई देवालय व शेजारच्या तटातील ओवऱ्या यांत समर्थांच्या राहण्याची व्यवस्था केली .१६०३ च्या रामनवमी नंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली आणि समर्थ आल्यावर वैशाखापासून तेथेच राहू लागले. गृहप्रवेश करतेवेळेसच समर्थ उद्गारले 'येथे आता स्वल्प काळ राहणे आहे; खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले. उद्धव स्वामी आक्का बाई यांशिवाय खोलीत कोणास येऊ देत नसे. कोणी काही कार्यभाग विचारले तर 'राम बुद्धी देईल तसे करा' म्हणून उत्तर देत. 'कोण्ही विचार पुसले काही | पूर्वीच सांगितले पाही | सांगावया आता काही | उरेचिना ||' पितळेच्या खुराचा पलंग होता,त्यावर नित्य बसून असत. अन्नाचा आहार अगदी टाकला होता. पाच चार महिने तर केवळ दुधावरच होते. जवळ कोणास येऊ देत नसत. एखाद्यास प्रसंगोपात बोलाविले तर त्याने तेवढे येऊन काय आज्ञा आहे ते विचारून जावे. उद्धव अथवा आक्का हे मात्र न विचारता खोलीत ये-जा करत व काय हवे नको ते पाहत. निजले असले तर उठवून दूध देत. पण ते दूधही स्वामींनी मर्जी असली तर घ्यावे नाही तर अपेक्षा नाही म्हणून सांगावे. उद्धव एके दिवशी म्हणाले की व्याधीनिरसनार्थ अनुष्ठान बसवितो व उत्तम वैद्य आणवितो; त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश दुसऱ्यास केला त्याचे हे सार्थक की काय? प्रारब्धाने देहाचे जे व्हायचे जेथे व्हायचे ते होत राहील. तेव्हा आक्का म्हणाल्या 'आपली इच्छा नसेल तर राहिला औषधोपचार; पण आता थंडीचे दिवस आले येथे डोंगरावर तर फार थंडी असते. तेव्हा चार दिवस खाली चाफळला किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी चलावे.'समर्थांनी उत्तर दिले - जेथे होईल हे प्रांत ( शेवट ) | तेथे भजतील हो भक्त | उत्साह चाफळी अद्भुत | राहील तेव्हा || 'आम्ही चाफळास जाण्याने श्री रघुवीराच्या उपासनेकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागेल यासाठी कोठेही आता जाणे नको; 'म्हणौनी सज्जनगडी वास | आम्हास करणे सावकास | जे होईल देहास | ते येथे घडे ||' अशाही स्थितीत पौषमासी ( मार्गशीर्षाचा क्षयमास होता ) डोमगावहून कल्याण स्वामी आले. त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत तपासून दिली. आणि आमची प्रतिज्ञा ऐसी | काही न मागावे शिष्यासी | आपणामागे जगदीशासी | भजत जावे ||' ही शेवटची ओवी करून ती १२-१० मध्ये घातली. 'मध्यरात्री साहावे तासी | समर्थ पाहती त्या मूर्तीसी | मेण होते जे नयनासी | ते काढविले || श्रीचे मुखावलोकन केले | परम समाधान झाले | याउपरी आले | राहणे न घडे || अवकाश पांच दिवस | उरला आहे आम्हास | कोण पुजील त्यास | यश घडो || करणाऱ्याच्या करविल्या | आणि त्याच्या श्रमाचा | प्रसाद झाला सर्वांचा | मनोरथ || अर्थात हे बोलणे बहुतेक स्वगतच झाले.दुसरे दिवशी सकाळी मूर्ती पाहण्यासाठी खोलीत मंडळी आली असता समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्ध निघाला - रवीकुळटिळकाचा वेळ संनिध आला | तदुपरी भजनाशी पाहिजे संग केला ||समर्थांचे मनोगत जाणून - अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी | बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी || हे दोन चरण उद्धवांनी म्हणून समर्थांचा श्लोक पूर्ण केला. ते पाहून समर्थ फार संतुष्ट होऊन म्हणाले 'उद्धवा शाबास भले शाबास!' आणि नंतर श्रीरामापुढे अखंड नामघोष सुरू केला. माघ कृ.८ स दोन प्रहरी निद्रा करून उठले, ते समयी वचने दोनी प्रत्येकी येकादशाक्षरे-- देवद्रोहीयांचा नाशची आहे || समुद्रातीरस्थांचा नाश आहे || बोलिले, असे लेखांक ४३ त म्हटले आहे. त्यातच शेवटी लिहिले आहे की, नवमी दो प्रहरा दर्शनासी बहुत लोक आले | त्यांस स्वमुखे आज्ञा दिली | ते लोक द्वारापासी उभेच आहेत | संनिध कोन्हासही येऊ दिल्हे नाही | तेच समयी पलंगावरून उतरून पादुकावरी उत्तराभिमुखी बैसले | श्रींचे स्मरण केले || "पलंगाखाली उतरले | पादुका पायी लेइले | उत्तर दिशेकडे केले | मुख बरवे || भक्तजन विनविती | पलंगावरी बैसावे म्हणती | तेव्हा बोलिले हो प्रीती | बैसाणे नाही || तुम्ही बैसवाल तरी पहा | म्हणोन उचलती जन दहा | शक्तिवंत करिती अहा | नुचलती आमुते || करिता बहुतची यत्न | नुचले अनुमात्र आसन | तेव्हा आज्ञापिले वचन | बाहेर बैसां || आक्का व उद्धव यांखेरीज बाकीचे सगळे बाहेर दाराशीच बसले, आणि समर्थांनी रघुपतीकडे दृष्टी लावून ध्यान धरले; त्याबरोबर आक्का व शिष्य मंडळी घाबरी होऊ लागली. ते पाहून समर्थ म्हणाले ,'इतके दिवस सेवेत राहून वेदान्त श्रवण केल्याचे व आध्यात्माच्या अभ्यासाचे फळ हेच काय? त्यावर आक्कांनी हात जोडून विनंती केली, घाबरे होणे किंवा ममतेत गुंतणे हे काहीच समर्थांनी ठेवले नाही, पण प्रत्यक्ष सेवा व सगुण दर्शन अंतरेल याचे वाईट वाटते'; त्या वेळी त्यांच्या ( व आज आपल्याही ) समाधानासाठी समर्थांच्या मुखातून पुढील अभंग प्रकटला - माझी काया गेली खरे | परी मी आहे जगदाकारे | ऐका स्वहित उत्तरे | सांगेन ती || नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट | तेणे सायुज्याची वाट | ठाई पडे || राहा देहाच्या विसरे | वर्तो नका वाईट बरे | तेणे मुक्तीची द्वारे | चोजविती || रामीरामदास म्हणे | सदा स्वरूपी अनुसंधान | करा श्री रामाचे ध्यान | निरंतर || या अभंगाचा आशय भीमस्वामींनी दोन ओव्यांत सांगितला तो असा - माझी काया आणि वाणी |गेली म्हणाल अंतःकरणी | परी मी आहे जग्जीवनी | निरंतर || आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वतःसिद्ध | असता न करावा खेद | भक्त जनी || नंतर श्रीसमर्थांनी रामनामाचा गजर तीन वेळा एवढ्या मोठ्याने केला कि त्या घोषाने मुहूर्तभरपर्यंत गडावरील सर्व आकाश दुमदुमून गेले. तीन वेळा स्मरण केले | अंबर अवघे गर्जिनले | रामनामे कोंदाटले | जिकडे तिकडे || मुहूर्त एक हो गर्जना | गगनी कोंदाटली जाणा | विस्मय पावलो निजजना | प्रेम आले || ध्वनी जाली संपूर्ण | जाहला अवतार हो पूर्ण | देशोदेशी भक्तजन | जाते जाले || या प्रकारे श्रीसमर्थांनी 'माघ वाद्य नवमी | दिवसा दोन प्रहर नेमी | शनिवारी परंधामी | योग केला || अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले. पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त उद्धव स्वामी व आक्का बाई होते. कल्याण स्वामी डोमगाव येथे होते. अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले. तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले.समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय. तत्त्वज्ञान[संपादन] रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. ते अद्वैतवेदान्ती होते. त्याच्या तत्त्वज्ञानास सन्त एकनाथान्च्या वाग्मयाची बैथक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म%, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म,भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वरचिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत. पहा : % चौदा ब्रह्म व्यक्तिमत्त्व[संपादन] मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नानसंध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्तम पारख होती. ते स्वतः उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोकस्थितीचे उत्तम ज्ञान होते, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती. बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे. ते स्वयंप्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वतःच ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वतःच शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करुणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्मसंस्थापना हेच त्यांचे कार्य होते. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा जो श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना समोर ठेऊन लिहिला आहे, तो अगदी समर्पक आहे . साहित्य व काव्यनिर्मिती[संपादन] समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते.त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे. श्री लवथवेश्वराचे पूजन समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके,भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.... समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाऱ्याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो. समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत. रामदासस्वामींनी श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली. दासबोधा शिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती, हे त्यांच्या पुढील कांही वचनांवरून दिसून येईल. समर्थ म्हणतात - ????? एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान,विवेक. भक्ती, प्रयत्न व सावधानता. समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की - प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।। समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात, बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी। चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।। मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात, ‘येक म्हणजी मऱ्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये। ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।। लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली। ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी। तैसी भाषा प्राकृत।।’ असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. साहित्य रचना[संपादन] • मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत. • दासबोध • आत्माराम • छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र • मारुति स्तोत्र • करुणाष्टके • राममंत्राचे श्लोक • सोलीव सुख • रामदास स्वामींचे अभंग • आनंदवनभुवनी • सवाई • अस्मानी सुलतानी समर्थसंप्रदाय[संपादन] समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजीच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला. समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत. • अनंत कवी • अनंतबुवा मेथवडेकर • अंबिकाबाई • आक्का बाई • उद्धव स्वामी • कल्याण स्वामी • केशव स्वामी • गिरिधर स्वामी • आचार्य गोपालदास • दत्तात्रय स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीमदास स्वामी • भोळाराम स्वामी • मेरु स्वामी • रंगनाथ स्वामी • रघुनाथ स्वामी • रोकडाराम स्वामी • वासुदेव स्वामी • वेणा बाई • हणमंत स्वामी

संत सावता (sankaleet lekh,www.manase.org)

संत सावता महाराज ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे, कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज. कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे. ‘‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’ हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्र्वर भेटतो. ‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’ असे म्हणणार्याी सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे. त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे. संत नामदेव म्हणतात - धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।। संत सावता महाराज हे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्र्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

संत चोखामेळा (संकलीत लेख,www.manase.org)

संत चोखामेळा ‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत. संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत! संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न,संवेदनक्षम,भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्याु आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंत भट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात. ‘धाव घाली विठु आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’ ‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’ ‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’ ‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’ ‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’ हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा सूर’ ही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो. ‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।। चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।’ ‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’ ‘आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे। चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।’ या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसात. ‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।। महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्र्वर।।’ या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्र्वर माउलींबद्दल ‘प्राणसखा’ हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या ‘संतकवी’ चे साहित्यगुणही दिसून येतात. त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार, म्हणून समजत असत. संत चोखोबा मंगळवेढ्याचे (जिल्हा सोलापूर) होते. त्यांना उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. संत बंका (चोखोबांचे मेव्हणे) व संत नामदेव यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत - ‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।। चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।। चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।। चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’ (- संत बंका) ‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।। काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।। माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।। नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।। (-संत नामदेव)

No comments:

Post a Comment